मुंबई: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतर रॅकेट उघडकीस आणले होते. एटीएसने कारवाई करून या दोघांना अटक केल्यानंतर आता या रॅकेटचा धागा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात पोहोचला आहे.
उत्तर प्रदेशमधील तब्बल 3 हजार मूकबधीर विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास तिथल्या दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोघांना अटक केली होती. आता या प्रकरणाचे बीड कनेक्शनही उघडकीस आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मूळच्या बीड जिल्ह्यातील शिरसाळा इथला रहिवासी असलेल्या इरफान खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
इरफान खान हा केंद्र सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागात नोकरी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी कारवायांत यापूर्वीही बीड कनेक्शन समोर आले होते. आता बळजबरीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणाचे कनेक्शनही बीडपर्यंत पोहोचले आहे.
अटकेबाबत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उत्तर प्रदेशात धर्मांतरण वाढीचा दावा करत योगी सरकारने धर्म परिवर्तन विरोधी कायदा बनविला.
या कायद्यान्वये कारवाई केली जात असताना उत्तर प्रदेश एटीएसने या दोघांना बेकायदेशीरपणे धर्मांतर केल्याबद्दल अटक केली.
हे दोघे देशव्यापी धर्मांतरण रॅकेटचा भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. यापूर्वी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केल्यानंतर एटीएसने आणखी तीन जणांना सोमवारी अटक केली.
भाजप नेते व आमदार अतुल भटखळकर यांनी या वृत्ताचा हवाला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.एका ट्विटमध्ये भटखळकर यांनीही ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले.
उत्तर प्रदेशात धर्मांतर करण्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीड तरूणाला अटक केली आहे.
त्याचे कनेक्शन महाराष्ट्रात खोलवर असले पाहिजेत. ठाकरे सरकारने हे या प्रकरणी लक्ष घालून हे प्रकरण शोधून काढले पाहिजे. “जनाब, मुख्यमंत्र्यांना हे आव्हान झेपेल का?” असा प्रश्न भातखळकर यांनी विचारला आहे.
काय आहे प्रकरण
हिंदू धर्मातील गरीबांना धर्मांतरासाठी बळजबरी करणाऱ्या रॅकेटचा उत्तर प्रदेश एटीएसने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 21 जून रोजी मौलाना जहांगीर आणि उमर गौतम या दोघा मौलानांना अटक केली.
त्यांना पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर यंत्रणा आणि विदेशातील आणखी एक मुस्लिम संघटना पैसे पुरवत होती.
त्यांनी आतापर्यंत 1 हजार हिंदूंचे धर्मांतर केले असून त्यात मूकबधिर मुले आणि महिलांचे प्रमाण अधिक आहे. रॅकेटमध्ये 100 हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
धर्मांतराच्या रॅकेटने नोएडा डेफ सोसायटीच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे जबरदस्तीने धर्मांतर केले. मागील दोन वर्षांपासून कानपूर, बनारस आणि नोएडामध्ये धर्मांतरासाठी सक्ती करण्याचे प्रकार सुरू आहेत.
धर्मांतर केलेल्या एक हजार महिला व मूकबधिर मुलांच्या नावांची यादी एटीएसच्या हाती लागली आहे. रॅकेटने कानपूरच्या एका मुलाला दक्षिणेकडील शहरात नेले. एटीएसकडून त्या मुलाचा शोध घेतला जात आहे.
हे देखील वाचा :
- Delta Plus Big update देशातील 45,000 पैकी 21,000 पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये गंभीर ‘व्हेरियंट’
- चिंताजनक परिस्थिती : डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 8 राज्यांत 50 टक्के रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
- दिल्लीत बोलावून नाना पटोले यांना कानपिचक्या, स्वबळाचा नारा अपरिपक्व