राज्यात काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप सुरू होता. मात्र मागील काही दिवसात आशादायक आकडे समोर येऊ लागले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे.
राज्यात गेल्या २४ तासात २६ हजार ६१६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर दिवसभरात ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आज राज्यात एकूण ५१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ४५ हजार ४९५ वर आली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत एकूण ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले आहेत.