Maharashtra Corona Update : राज्यातील 46 लाख रुग्ण कोरोनामुक्त; आज 58,805 जणांना डिस्चार्ज

174
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

राज्यात नव्याने वाढ होणाऱ्या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली.

आज (दि.12) राज्यात 58 हजार 805 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 46 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 48 हजार 781 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 लाख 26 हजार 710 झाली असून, त्यापैकी 46 लाख 196 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 88 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्या राज्यात 5 लाख 46 हजार 129 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 816 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एकूण 78 हजार 007 जण मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

राज्यात 36 लाख 13 हजार जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 417 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत तब्बल तीन कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

राज्यात सध्या लागू असलेला लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याबाबत सर्व मंत्र्यांचे एकमत झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली आहे. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच, राज्यातील लसीचा तुटवडा लक्षात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तुर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here