मुंबई : राज्यात आज, शनिवारी सलग दुस-या दिवशी दहा हजाराहूंन अधिक कोरोना बाधित रूग्णांची वाढ झाली. राज्यात आज दिवसभरात 10 हजार 187 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला.
यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाखांच्या पुढे गेली आहे. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 08 हजार 586 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 62 हजार 031 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज दिवसभरात 6 हजार 080 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.36 टक्के झाले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या राज्यात एकूण 92 हजार 897 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 47 रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आजवर 52 हजार 440 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.37 टक्के एवढा आहे. राज्यात 4 लाख 28 हजार 676 जण होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 514 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
सध्या राज्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, आकोला, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यात सक्रिय रूग्णांची अधिक आहे.
लातूर जिल्ह्यात 69 कोरोनाबाधित रुग्ण
आज लातूर जिल्ह्यात 69 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25838 वर पोहचली आहे. लातूर जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 712 आहे.
लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 24413 आहे. 80 रुग्ण आज बरे झाले आहेत.