Maharashtra Corona Update | मोठा दिलासा, राज्यात 74, 045 रुग्ण बरे होऊन घरी, 66,836 नवीन रुग्णांचे निदान तर 773 मृत्यू

322
Jalna district shaken: 4 corona victims die in a single day

मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.

आज 66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे.

राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याचं समोर येऊ लागलं आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 74 हजार 045 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के झाले आहे.

राज्यात आज 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.

मुंबई गेल्या 24 तासात 7199 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 7199 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 21 हजार 104 वर पोहोचली आहे. सध्या 81 हजार 174 एकूण सक्रिय रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here