Maharashtra Corona Update Maharashtra : राज्यात 63,842 रुग्ण कोरोनामुक्त; 62,194 नव्या रुग्णांची नोंद

237
latur - jalkot-coronavirus-positive-cases-

मुंबई : राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज, गुरुवारी दिवसभरात राज्यात 63 हजार 842 रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर 62 हजार 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तसेच कोरोनामुळे 853 रूग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आजपर्यंत एकूण 42,27, 940 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 85.54 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

 

राज्यात एकूण 6,39,075 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या2,86,61,668 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 49,42,736 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 38,26,089  व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,406  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here