मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्याने सरकार व प्रशासन विविध पातळीवर अनेक उपाययोजना करीत आहे. या सर्व संकटात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे काल (दि.९) सलग दुसऱ्या दिवशी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
काल राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात आज 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.4 % एवढे झाले आहे. काल 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.
राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,94,38,797 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51,01,737 (17.33टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,96,896 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,939 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,15,783 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चालले आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोना रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही.
यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असे मत हायकोर्टानं देखील व्यक्त केले होते. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल आणि आरोग्य सुविधांशी संबंधित कामं वगळता सर्व गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार
राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळं राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी होत नाही. दररोज 50 ते 60 हजारांच्या घरात रुग्ण संख्या येत आहे. त्यामुळं एक तृतीअंश राज्य हे उतरत्या वळणार असून उर्वरित भागावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती टोपे यांनी दिली.