आघाडी सरकारकडून धनगर समाजासाठीच्या योजना बंद | गोपीचंद पडळकर यांचा आरोप

410

मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (BJP leader Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारवर धनगरविरोधी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने धनगर समाजासाठी सुरु केलेली योजना बंद केल्याचाही आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच सरकारने जे आदिवासींसाठी ते धनगरांसाठी या न्यायाने तात्काळ धनगर समाजाला निधी उपलब्ध करुन देत योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांसाठी फडणवीस सरकारने 2018 मध्ये महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना सुरु केली होती.

या योजनेत प्रत्येक तालुक्यातील 15-20 युवकांना मेंढ्या दिल्या जायच्या. यासाठी लाभार्थीने 47 हजार रुपये भरल्यानंतर 3 लाख रुपयांपर्यंतच्या शेळ्या आणि मेंढ्या या योजनेतून दिल्या जायच्या.

मात्र, आघाडी सरकारच्या काळात मागील वर्षीच्या मागणीधारकांना देखील हा निधी देण्यात आला नाही. या वर्षी देखील या योजनासाठी काहीही तरतूद नाही.”

“या योजनेतून बेरोजगारांना पर्याय मिळाला होता. यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ झाला. परंतू राज्यात हे महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून एकही योजना पुढे कार्यन्वित केली नाही. 

हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात भूमिका घेतंय. फडणवीस सरकारने जी 1 हजार कोटी रुपयांची घोषणा केली, त्यावरही पुढे कार्यवाही झाली नाही. त्यावरुन हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचं दिसतंय. 

यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना पुन्हा सुरु करावी,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. 2019-20 चे 1 कोटी आणि 2020-21 चे 1 कोटी निधी द्यावा.

जे आदिवासींना ते धनगरांना या प्रमाणे निर्णय घ्यावा. यावर्षी आदिवासींना 8 हजार 853 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यापटीत धनगरांनाही निधी द्यावा,” अशी मागणीही पडळकरांनी ठाकरे सरकारकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here