Maharashtra Lockdown: राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सर्वच मंत्री आग्रही राहिल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई: कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (Coronavirus in Maharashtra) लॉकडाउननंतर रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
कोरोनाचा या आशादायक पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात लॉकडाऊन वाढविण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. राज्यातील लॉकडाउन) ३१ मे पर्यंत वाढविण्यावर चर्चा झाली.
हा लॉकडाऊन वाढविला पाहिजे अशी मागणी मंत्रिमंडळाने केली आहे. पण आता अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लॉकडाऊनबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊननंतर राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण हे भारताच्या सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवसांसाठी वाढविण्यात यावे, असे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनाही कळविण्यात आले. आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून राज्यात लागू असलेले कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. एप्रिल महिन्यात ६८ हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णवाढ घटून ४० हजारांपर्यंत आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.
18-44 वर्षांच्या लसीकरण मोहिम तात्पुरती स्थगित
राजेश टोपे म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रातील 18-44 वर्षांच्या लसीकरण मोहिम तात्पुरती स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख अदार पुनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते म्हणाले की, २० मेनंतर महाराष्ट्रात दरमहा 1.5 कोटी डोस दिले जातील. लंडनहून भारतात आल्यावर याचा सामना कसा करावा याचा निर्णय ते घेतील.
भारत सरकार 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देऊ शकत नाही. म्हणून दुसरा डोस देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाईल. दुसर्या डोससाठी 20 लाख डोस आवश्यक आहेत. सध्या फक्त 10 लाख आहेत. पहिल्या डोसची त्वरित अपेक्षा केली जाऊ नये. जर 4 ते ५ दिवसांनी अधिक लस उपलब्ध झाल्या तर आम्ही पहिल्या डोसचा निर्णय घेऊ, असेही राजेश टोपे म्हणाले.