मुंबई : महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात दररोज ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. त्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेतला आहे.
कारण राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडीसीवीर, यांचा तुटवडा भासत आहे. करोनाची ही साखळी तोडण्यासाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘उद्या रात्री ८ पासून राज्यात कडकडीत लॉकडाऊन’ करण्यात यावा अशी मागणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यानी केली आहे.
याबाबतची माहिती राज्याचे आरोयमंत्री राजेश टोपे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. ‘राज्यात उद्या रात्री ८ पासून संपूर्ण लॉक डाऊन करण्यात यावा अशी मागणी सर्व मंत्र्यानी केली असून यावर काय निर्णय घ्यायचा हे आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ठरवतील’ अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून लॉकडाऊनबाबतची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिली आहे.
हा लॉकडाऊन पुढील 15 दिवसांसाठी असणार आहे. लॉकडाऊनबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील. लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स काही वेळातच जारी करण्यात येणार आहेत.
लॉकडाऊन अत्यंत कडक असला पाहिजे. गेल्यावर्षी जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तसाच हा लॉकडाऊन हवा आहे.
राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत असल्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले.
जिल्हाबंदी आणि रेल्वेही बंद
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधातना गेल्या वर्षीप्रमाणेच कडक लाॅकडाऊन लागू होण्याचे संकेत दिले आहेत. कोणालाही बाहेर फिरता येणार नाही.
जिल्हाबंदी होणार आणि रेल्वेही बंद होणार असल्याचे संकेत भुजबळ यांनी दिले आहेत. हा लाॅकडाऊन 15 दिवसांसाठी ठेवण्याची गरज असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. नेमके काय निर्बंध असतील, यासंदर्भातील निर्णय उद्या मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत.
लॉकडाऊन आवडीचा विषय नाही : एकनाथ शिंदे
आज लॉकडाऊनशिवाय पर्याय देखील नसल्यामुळे मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि हा निर्णय उद्यापासून लागू करतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
- Rajnetanews.com आता टेलिग्रामवर ! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा !