Maharashtra Lockdown Update : राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल होणार | रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम : विजय वडेट्टीवार

249
Lockdown Maharashtra New Guidelines | Do you know the new rules of Licidown? These are new changes!

मुंबई : राज्यात करोनाची रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे राज्यात रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का ? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहे.

राज्यातील १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणू घोषित करण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असलं तरी करोनाच्या रुग्णांध्ये घट होताना दिसत नाही.

त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येतील. दरम्यान, यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलसंबंधीही महत्त्वाची माहिती दिली आहे.

सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी लोकल सुरू असून अजून पुढचे १५ दिवस तरी नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार नाही असेही ते म्हणाले. करोनाचा धोका कमी होत असला तरी लोकल सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढेल.

त्यामुळे सध्या लोकल मर्यादित नागरिकांसाठीच असणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. आता १ जून नंतर लॉकडाऊन शिथिल झाले तर जनजीवन हळूहळू सुरळीत होणार आहे.

रेड झोन मधील 14 जिल्हे

अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली

रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. सोबतच मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here