कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला यश | आजही कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

151

Maharashtra Corona Updates : कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला यश येताना दिसत आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे.

नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४० हजार ९५६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७१ हजार ९६६ इतकी नोंदवली गेली आहे. 

राज्यात सध्या ५ लाख ५८ हजार ९९६ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत राज्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ इतकी झाली आहे. तर कोरोनातून बरं झालेल्यांचा आकडा ४५ लाख ४१ हजार ३९१ इतका आहे.

राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ७७ हजार १९१ इतक्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदविण्यात आल्यानं महाराष्ट्रासाठी ही अतिशय दिलासादायक बातमी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here