महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली | 24 तासांमध्ये 4,787 नवीन रुग्ण आढळले !

142
coronavirus-cases-in-india-

महाराष्ट्रात कोरोनाचे प्रकरण सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये येथे 4,787 नवीन संक्रमित आढळले आहेत. ही संख्या 5 डिसेंबरनंतर सर्वात जास्त आहे. 

तेव्हा 4,922 केस आल्या होत्या. राज्यात गेल्या सात दिवसांपासून 3,000 पेक्षा जास्त प्रकरणे येत आहेत. यापूर्वी 21 जानेवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत हा आकडा एकदाही 3,000 च्या पार केला नव्हता.

दरम्यान देशात बुधवारी एकूण 12,511 नवीन रुग्ण समोर आले. 11,847 बरे झाले आणि 90 संक्रमितांनी जीव गमावला. आतापर्यंत कोरोनाच्या 1.09 कोटी केस समोर आल्या आहेत.

यामधून 1.06 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. 1.56 लाख जणांनी जीव गमावला आहे. तर 1.34 लाख जणांवर उपचार सुरू आहेत.

तर महाराष्ट्रात बुधवारी 4787 लोक कोरोना संक्रमित आढळले. 3,853 रुग्ण बरे झाले आणि 40 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 76 हजार 93 लोक संक्रमित झाले आहेत.

यामधूल 19 लाख 85 हजार 261 लोक बरे झाले आहेत. 51 हजार 631 ने या महामारीमध्ये जीव गमावला आहे. 38 हजार 13 रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here