देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही.
पुणे : ‘महाराष्ट्राचे दुर्दैव असे कि ज्यांना मतदारांनी नाकारले तेच सत्तेत आहेत. या सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. भाजप सत्तेत येईल या भीतीने नाराज असलेले पुन्हा एकत्र येण्याचे प्रकार घडले.
महाविकास आघाडी सरकार संपूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत असून, वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झालेत. कोरोना महामारीतही भ्रष्टाचार केला गेला आहे.
जयंत पाटलां सारखी जेष्ठ नेत्यांना कसे बोलावे हे शिकविण्याची वेळ आली आहे. ते मला ‘चंपा’ म्हणत असतील तर आम्हीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘उठा’ म्हणावे का? अशी विचारणा केली.
आपले वाभाडे निघतील या भितीनेच सरकार अधिवेशन घ्यायला घाबरत आहे. हिंमत असेल तर अधिवेशन घेऊन दाखवा.’ असे थेट आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे.
सध्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला असून, कोणी म्हणते आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणते होणार नाही. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे. या सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकर्यांचे झाले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकर्यांचे कर्ज माफ झाले नाही. या सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले.
देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. शिक्षणातलं आरक्षण यांनी आता रद्द केले, असा आरोप पाटील यांनी महाविकास आघाडी सरकरावर केला आहे.
ही आमची संस्कृती नाही
चंपा म्हणटल्याने काय झालं, असा सावाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हाणाले, चंपा, टरबूज्या असे म्हटले जाऊ नये. आम्ही देखील मर्यादा पाळतो.
आम्ही त्या पद्धतीने बोलू शकतो. उद्धव ठाकरे ना ‘उठा’ म्हणायचे का, जयंत पाटील यांना ‘जपा’ म्हणायचे का? शरद पवार यांना ‘शपा’ म्हणायचे का? असा सवाल करून ही आमची संस्कृती नसल्याचे पाटील यांनी सांगितले.