विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली

195

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे.

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय झाला आहे.

नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

मराठवाडा पदवीधरमध्ये सतीश चव्हाण विजयी 

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.

महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं. पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली.

सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

पुणे पदवीधर मतदारसंघ अरुण लाड यांचा विजय

पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे.

त्यामुळे अरुण लाड हे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत.

महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं, 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे.

अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा काँग्रेसचा दावा

नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी ट्विटरवर दिली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर 1 लक्ष 33 हजार 53 मतांची मोजणी पूर्ण झाली.

तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा 60 हजार 747चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही.

अभिजित वंजारी एकूण मतं 55 हजार 947, संदीप जोशी एकूण मतं 41 हजार 540 , अतुल कुमार खोब्रागडे 8 हजार 499 , नितेश कराळे 6 हजार 889 मतं मिळाली.

विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक 2 सुरु करण्यात आला.

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून काँग्रेसचे जयंत आसगावकर हे आघाडीवर आहेत.

विसाव्या बाद फेरी अखेर जयंत आंसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मते मिळाली आहेत.

भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार इथे तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यांना पाच हजार 878 इतकी मतं मिळालेली आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष सरनाईक आघाडीवर

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार अॅड किरण सरनाईक 6 हजार 390 मत घेत आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे 5 हजार 383 मतांनी द्वितीय क्रमांकावर तर शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर 5150 मतांनी तृतीय क्रमांकावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here