चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा : ब्राह्मण महासंघाची मागणी

154

पुणे : कणकवली येथील सभेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे.

त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन भाजपने हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या कुलकर्णी यांनी याबाबत पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथे गुरुवारी झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण द्वेषाची गरळ ओकली आहे.

मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशज आहेत, अशी अपमानास्पद टिप्पणी करून ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या मानसिकतचे दर्शन घडविले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.

स्वत:च्या कर्तृत्वामुळे आपल्या जिल्ह्यातून निवडून न येण्याची खात्री पाटलांना पटली होती.

यानंतर सुरक्षित अशा ब्राह्मणबहुल कोथरुड मतदार संघात घुसखोरी केली.

विद्यमान ब्राह्मण आमदारांची उमेदवारी कापून आयत्या बिळावरील नागोबासारखे बसले आहेत.

अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आता ब्राह्मण समाज अद्दल घडवणार आहे.

भाजपने पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी.

भाजपने ब्राह्मणांना गृहीत धरण्याची भूमिका या पुढेही चालु ठेवल्यास पक्षालाही अद्दल घडविण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here