Malaika Arora Photoshoot मलायकाचे सेक्सी डिझायनर गाउनमध्ये HOT फोटो व्हायरल झाले आहेत.
चाळीशी ओलांडली तरी पंचविशीतील तरुणीसारखी दिसणारी मलायका अरोरा (Malaika Arora) आजही आपल्या सौंदर्यानं लाखो जणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.
काही दिवसापूर्वी स्ट्रेच मार्क वरून तिला ट्रोल करण्यात आले होते, तेव्हा तिने स्वतः समोर येत आपले स्ट्रेच दिसतील असे फोतोशुट करून पोस्ट केले होते.


करड्या रंगातील सळसळत्या डिझायनर गाउनमधील मलायका अत्यंत आकर्षक दिसत असून, तिचा कमनीय बांधा, लांबसडक पाय नजर खिळवून ठेवत आहेत.
अनेकदा मलायका तिचे जिममधील फोटो शेअर करते. व्यायामासाठीचे तिचे कपडेही एकदम हटके असतात. मलायका आपल्या फिटनेस व फोटोशूट वरून कायम सोशल मिडीयावर चर्चेत असते.


काळ्या रंगाच्या झिरझिरीत फ्रॉकस्टाईल ड्रेसमध्ये मलायका हॉट दिसत आहे. यातील तिची पोज अत्यंत आकर्षक असून, तिचा फिटनेस सहज कळून येतो. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.


गोल्डन रंगाच्या टाईट फिट अशा या गाउनमध्ये मलायका एकदम सेक्सी दिसत आहे. फिटनेसला वयाचं बंधन नसतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मलायका आहे. तिची फिटनेस चाळीशीतील महिलांसाठी प्रेरणा आहे.


पिवळ्या रंगाच्या घेरदार गाउनमध्ये मलायकाचं सौदंर्य अगदी खुलून आलं आहे. वाऱ्यावर उडणारा या ड्रेसचा घेर जणू एखाद्या फुलाच्या पाकळीप्रमाणे दिसत आहे.
खांद्यावरही फुलाच्या पाकळीसारखी रचना आहे. मोकळे सोडलेले केस, पिवळा रंग आणि वाऱ्यावर उडणारा ड्रेस अशा या फोटोतील मलायकाची अदा वेड लावणारी आहे.


काळसर रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी उजेडात जाळीदार वर्क असलेल्या ड्रेसमध्ये मलायका अतिशय स्टनिंग दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर पडलेला उजेड, ड्रेसचे रिफ्लेक्शन यामुळं ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.


गोल्डन आणि हिरव्या रंगाचे चकचकीत वर्क असलेल्या या शर्ट स्टाईल शॉर्ट ड्रेसमध्ये मलायका अतिशय सेक्सी दिसत आहे. डार्क पिंक कलरच्या हायलाईट केलेल्या कुरळ्या केसांमुळे थोड्याशा डस्की मेकअपमधील मलायका वेगळीच भासत आहे.


आणखी एका काळ्या रंगाच्या ड्रेसमधील मलायकाचा फोटो अत्यंत देखणा आहे. चमकदार अशा मटेरियलमधील या गाउनमध्ये मलायकाचं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे.
अर्धा भाग उजेडानं उजाळलेल्या काळ्या पार्श्वभूमीवर, मांडीपासून स्लीट असणाऱ्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर आणि सेक्सी दिसत आहे.


जांभळट रंगाच्या पार्श्वभूमीवर चमकदार डार्क पिंक कलरच्या मिनि ड्रेसमध्ये मलायकाचे शरीरसौष्ठव ठळकपणे जाणवत आहे. मोकळे सोडलेले प्रकाशात चमकणारे सोनेरी रंगाची झटा असलेले केस, डार्क पिंक कलरच्या ड्रेसचं रिफ्लेक्शन यामुळं ती अतिशय सुंदर दिसत आहे.


वरच्या बाजूला पारदर्शक कापडाचा आणि खाली बारीक नक्षीकाम केलेला पायघोळ गाउन अशा या ड्रेसमध्ये मलायका अक्षरशः मदालसा दिसत आहे.
चेहऱ्यावर पुढे आलेल्या केसांच्या नाजूक बटा, मागून पडलेला उजेड आणि आकर्षक प्रकाश रचना यामुळं तिचं सौंदर्य उजळून निघालं आहे.


निळ्या रंगाच्या अतिशय स्टायलीश अशा ड्रेसमध्ये मलायकाची परफेक्ट फिगर उठून दिसत आहे. निळ्या पार्श्वभूमीवर तिची स्लीम ट्रीम आणि रेखीव फिगर या ड्रेसमध्ये खुलून आली आहे. (सर्व फोटो : Instagram)