
मलायकाने छायाचित्रकारांना दिले फोटो
मलायका योग क्लासमधून बाहेर आल्यानंतर छायाचित्रकारांनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. या फोटोत तिच्या पोटावरचे स्ट्रेच मार्क लोकांच्या नजरेतून सुटले नाही.

पुन्हा एकदा ट्रोल झाली मलायका
फोटोंमध्ये दिसत असलेल्या स्ट्रेच मार्कमुळे सोशल मीडियावर मलायकाला ट्रोल करण्यासाठी काही युझर्सना निमित्त मिळालं.
पोटावरून कळतं फिटनेसचं रहस्य
प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने मलायकाचे काही फोटो त्याच्या सोशल अकाउंटवर शेअर केले. याच फोटोंवर यूझर्सने कमेन्ट करायला सुरुवात केली.
अर्थात मलायकाला फक्त ट्रोल करण्यात आलं नाही तर अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. तिच्या फिटनेसचं कौतुक करताना एका युझरने तिची तुलना जेनिफर एनिस्टन आणि जेनिफर लोपेज यांच्याशी केली.

काही दिवसांपूर्वीही स्ट्रेच मार्कमुळे आली होती चर्चेत
मलायका तिच्या गरोदरपणातील स्ट्रेच मार्कमुळे याआधीही चर्चेत आली होती. सुट्ट्यांचे फोटो शेअर करताना तिचे स्ट्रेच मार्क दिसले होते.
मलायका अरोरा तेव्हा मालदीवमध्ये होती आणि तेव्हा तिने तिथले काही फोटो शेअर केले होते. त्या सर्व फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास पूर्ण दिसत होता. याचमुळे सोशल मीडियावर तिचं कौतुकही करण्यात आलं होतं.