मराठा समाजाने ‘नरेंद्र व देवेंद्र’ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा : सुधाकर भालेराव

519
Sudhakar Bhalerao

मराठा समाजाला आरक्षण फक्त भाजपा व फडणवीस मिळवून देऊ शकतात.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही.

मराठा समाजाला भाजपा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते, मात्र त्याला काही जणांनी जाणीवपूर्वक खोडा घातला, त्यामुळेच मराठा आरक्षण रखडले असा आरोप भाजपा अ.जा.मोर्चा प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केला आहे.

आज महाविकास आघाडीतील काही नेते केंद्र व मोदी सरकारने मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहेत. यावरूनच या सरकारने मराठा आरक्षण कसे रखडवले हे लक्षात येते.

या महाविकास आघाडी सरकारने नोकर भरती मधील आरक्षणाला खोडा घातला, ओबीसी आरक्षणाचे नुकसान केले. सत्तेत आल्यापासून फक्त दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. आघाडी सरकारचा राजकिय डाव मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करणे आहे.

मराठा समाजाला फक्त भाजपा व राज्याचे कुशल नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीचं आरक्षण मिळू शकते. भाजपा सत्तेत नाही म्हणून आरक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही.

मराठा समाजाला आरक्षण भाजपाने मिळवून दिले होते, ते या सरकारच्या उदासिनतेमुळे न्यायालयात टिकले नाही. हे सरकारचे अपयश आहे. या सरकारने मराठा समाजाची घोर निराशा केली आहे. त्याला मराठा समाज कधीही माफ करणार नाही.

केंद्रातील मोदी सरकारकडे आरक्षणाची मागणी करून भाजपानेचं ‘मराठा समाजाला आरक्षण दिले नाही’ हा आरोप करता यावा म्हणून मागणीचे नाटक करीत आहेत. राज्यातील सरकार आरक्षणाच्या प्रश्नाचे राजकारण करीत आहे, हे निंदनीय आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘देवेंद्रजी व नरेंद्रजी’ सक्षम आहेत. भाजपा दोन समाजाच्या मनात तेढ निर्माण करणार नाही, तर दोन समाजात सलोखा कायम राखत आरक्षण मिळवून देईल, असा विश्वास भालेराव यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षण असो की पदोन्नतीचा प्रश्न असो भाजपाने सतत न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. काही नेते मराठा आरक्षणाआडून राज्यात कुटील राजकारण करीत आहेत. या षड्यंत्राला मराठा व ओबीसी समाजाने बळी पडू नये.

आज मीडिया व सोशल मीडियावर फक्त भाजपा व नेत्यांवर चिखलफेक सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण न देता फक्त आरक्षणाचा प्रश्न चिघळवून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही नेते सतत बेफाम व बालिश वक्तव्य करून दिशाभूल करीत आहेत.

मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध ओपन, ओपन विरुद्ध दलित असे संघर्ष जाणीवपूर्वक घडवत आहेत. तेव्हा महाविकास आघाडी सरकारने सामाजिक तेढ निर्माण करण्याऐवजी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत, जर शक्य नसेल तर ते मान्य करावे; असा टोला भालेराव यांनी लगावला आहे.

आगामी काळात माननीय देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय भाजपा सरकार नक्की मराठा समाजाला न्याय मिळवून देईल, मराठा समाजाने ‘नरेंद्र व देवेंद्र’ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा असेही आवाहन प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here