Maratha Muk Andolan Updates : कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा ‘एल्गार’ | मराठा आंदोलनाची मशाल महाराष्ट्रभर धगधगणार

406

कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन सुरू झाले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे मूक आंदोलन होत आहे. 

Maratha Muk Andolan Updates:

या आंदोलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि युवराज छत्रपती मालोजीराजे सहभागी झाले आहेत.

Maratha Muk Andolan Kolhapur

संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. पहिले पाऊल म्हणून कोल्हापुरात आज मूक आंदोलन होत आहे. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधीही या आंदोलनात सामील झाले आहेत.

आंदोलन सुरू झाल्यानंतर संभाजी राजे यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केले. ‘आजचे आंदोलन शांत आहे, केवळ लोकप्रतिनिधी बोलतील. उपस्थित असलेल्यांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींकडे प्रश्न विचारू नयेत.

Maratha Muk Andolan Kolhapur

लोकप्रतिनिधींनी त्यांची भूमिका मांडावी. आंदोलकांनी त्यांचे म्हणणे ऐकावे, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी केले. दरम्यान, आंदोलन सुरू होण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातील आंदोलनस्थळी दाखल झाले.

मराठा आरक्षण आंदोलन

प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजे यांना आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here