Maratha Reservation: सरकारला महिनाभराची मुदत; पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास आंदोलन : खासदार संभाजीराजे

348

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून उर्वरित मागण्यांच्या प्रशासकीय पूर्ततेसाठी सरकारने 21 दिवसांचा वेळ मागितला आहे.

आम्ही त्यांना एक महिन्याची मुदत दिली असून तोपर्यंत मूक आंदोलन पुढे ढकलण्यात येत आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज केली.

आंदोलन मागे घेतलेले नसून या एक महिन्यात राज्य समन्वयकांच्या बैठका सुरूच राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यानुसार एक महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही कार्यवाही पूर्ण झाली नाही तर पुन्हा समाज आंदोलन करेल, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या विषयावर कोंडी फुटावी, यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मूक आंदोलन सोमवारी येथे करण्यात आले.

गंगापूर रोडवर झालेल्या या आंदोलनात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना छ.संभाजीराजे म्हणले की, ‘समाज बोलला, आम्ही बोललो; लोकप्रतिनिधींनो, आता तुम्ही बोला!’ अशी हाक देत नाशिक येथे आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मूक आंदोलन करण्यात आले.

रावसाहेब थोरात सभागृहाच्या प्रांगणात झालेल्या या आंदोलनानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक झाली आणि त्यानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना छ.संभाजीराजे म्हणाले, ‘आतापर्यंत कोल्हापूर आणि नाशिक येथे मूक आंदोलन झाले. मराठा आरक्षणासाठी 36 जिह्यांमध्ये आंदोलन करावे तसेच पुणे ते विधान भवन लाँग मार्च काढावा अशी आमची इच्छा नाही.

आम्हाला समाजाला दिशा द्यायची आहे, दिशाहीन करायचे नाही. सरकारने तातडीने निर्णय घेऊन मागण्यांची पूर्तता करावी. तोपर्यंत संभाजीनगर, रायगड आणि अमरावती येथील मूक आंदोलन पुढे ढकलण्यात येत आहे’ असे संभाजीराजांनी जाहीर केले.

येत्या गुरुवारी राज्य शासन रिवह्यू पिटिशन दाखल करणार आहे. त्यासाठी २१ दिवसांचा वेळ मागितला असल्याने आंदोलन पुढे ढकलले आहे.

आपण राज्यभर दौरा करून समाजतील विविध घटकांशी बोलणार आहोत. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे.

सरकारने महिनाभरात मागण्यांची पूर्तता केली नाही तर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल. राज्य शासन आणि केंद्र सरकारने समन्वयाची भूमिका घेतली तरच आरक्षण मिळू शकेल, असे संभाजीराजे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या सूचनेचे स्वागत

मुंबईतील विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे खा. संभाजीराजे यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here