विवाहितेवर बलात्कार | दुष्कृत्याचा व्हिडीओ नातेवाईकांच्या सोशल मीडियावर व्हायरल

163
CRIME news

एका विवाहित महिलेने आपल्या नातेवाईकावर विश्वास केला आणि त्या नातेवाईकाने चक्क विश्वासाचा चक्काचूर केला आणि तिचे आयुष्य उद्वस्त केले.

विवाहित महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला उसाच्या रसातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ बनवून तो नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल केला. 

ही घटना 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत चिखली परिसरात घडली. याबाबत 30 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विवाहित महिलेच्या चुलत दिराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला तिच्या चुलत दिराने उसाच्या रसमधून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या दुष्कृत्याचा आरोपीने व्हिडीओ तयार केला.

8 फेब्रुवारी रोजी आरोपीने तो व्हिडीओ पीडित विवाहित महिला, तिचा पती, इतर नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या व्हाट्सअपवर पाठवून तिची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here