एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेची मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

169
Sucide

पुणे : एका वर्षापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली आहे.

दारूसाठी पत्नीने माहेरहून पैसे आणावेत यासाठी सतत त्रास देत होता. आरोपी पती नेहमीच दारूच्या नशेत पत्नीला त्रास देत होता.

मद्यपी पतीच्या सतत होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आयुष्य संपवले आहे.ही घटना 4 जून रोजी पुण्यातील लष्कर भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

स्वाती रोहित पवार असे विवाहित महिलेचे नाव असून ती आपल्या पतीसह पुण्यातील लष्कर भागात राहत होती. आरोपी पती रोहित राजू पवार याला दारूचे व्यसन होते. मद्यपान केल्यामुळे त्याला नोकरी किंवा रोजगार नव्हता.

दारूचे व्यसन भागविण्यासाठी राजू नेहमीच आपल्या पत्नीला त्रास देत होता. माहेरकडून खर्चासाठी व दारूसाठी पत्नीने पैसे आणावेत म्हणून नेहमी मृत स्वातीला त्रास देत होता. तिला अनेकदा शिवीगाळ व मारहाण देखील करीत होता.

यामुळे मद्यपी पतीच्या सतत छळाला कंटाळून मृत स्वातीने स्वत: च्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली आहे.

या प्रकरणात निर्मला मिसाळ यांनी विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी पतीसह एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्वातीने आरोपी पती रोहितसोबत अवघ्या एका वर्षापूर्वी लग्न केले होते. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हे देखील वाचा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here