वैद्यकीय अधिकार्‍याला पत्नीने परिचारिकेसह ‘रंगेहाथ’ पकडले !

191
Love Affiair

येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍याने पत्नी घरी नसल्याची संधी साधत राणी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करणार्‍या प्रेमिकेला भेटण्यासाठी बोलावले.

परंतु पत्नीने वडील व भावासोबत येलदरी गाठून परिचारिका व पतीस नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना 31 जानेवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील शासकीय निवासस्थानात घडली.

याबाबत वैद्यकीय अधिकार्‍याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकार्‍यांसह परिचारिका, आई-वडील भाऊ-बहीण या 6 जणांविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेचा डॉ. कैलास काशिनाथ पवार यांच्यासोबत 6 मार्च 2017 रोजी परभणी येथे विवाह झाला होता.

लग्नानंतर पती डॉ. कैलास पवार, सासरा काशिनाथ पवार, सासू गोदावरी पवार, दीर किशोर पवार, नणंद कविता पवार यांनी संगणमत करून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

पती गाडी घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणण्यासाठी मारहाणकरू लागला.ही बाबत फिर्यादी महिलेच्या पालकांना समजताच त्यांनी रक्कम देऊन छळ थांबविण्याची विनंती केली.

दरम्यान, जानेवारी-2019 ते ऑगस्ट-2020 मध्ये डॉ. कैलास पवार हे कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना कंत्राटी परिचारिका वनिता कानगुले (राजे) हिच्यासोबत त्यांचा परिचय झाला.

या ‘प्रेम’ प्रकरणाची वाच्यता सगळीकडे झाल्यानंतर वनित हिने डॉ. कैलास पवार यांच्या वडील व सासर्‍याकडून 15 लाख रुपये घेऊन या नंतर मी डॉ. पवार यांच्याशी संबंध ठेवणार नाही म्हणून लिहून दिले होते.

परंतु डॉ. कैलास पवार यांची येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते.

27 जानेवारी 2021 रोजी फिर्यादीची तब्येत ठीक नसल्याने तिचे आई-वडील तिला दवाखान्यात दाखविण्यासाठी औरंगाबाद येथे घेऊन गेले.

बायको नसल्याची संधी साधत डॉ. कैलास पवार याने वनिता कानगुले (राजे) हिला येलदरी येथील वैद्यकीय अधिकार्‍याच्या निवासस्थानी बोलावून घेतल्याची माहिती विवाहितेला मिळाली.

त्यावरून ती 31 जानेवारी रोजी रात्री वडील व भावा सोबत ती तेथे हजर झाली. यावेळी घर आतून बंद दिसल्याने तिचा भाऊ घराच्या छतावरून घरात उतरला. यावेळी हे दोघे नको त्या अवस्थेत घरात आढळून आले.

याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. कैलास पवार, सासरे काशिनाथ पवार, सासु गोदावरी पवार, किशोर पवार, नणंद कविता पवार यांच्याविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी रात्रीच डॉ. कैलास पवार व वनिता कानगुले या दोघांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here