लखनौ पोलिसांनी हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्या एका गॅंगच्या पाच सदस्यांचा पर्दाफाश केला आहे. यात तीन पुरूष आणि दोन महिला सामील असल्याचे समोर आले आहे.
तीन पुरूषांनी पोलिसांचा गणवेश घातला होता आणि ते लोकांना धमकावून लोकांकडून पैसे लुटत होते. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हजरतगंज भागातील एका व्यक्तीने पोलिसांनी माहिती दिली होती की, दोन महिला आणि तीन पोलीस मिळून त्याला ब्लॅकमेल करत आहेत.
मात्र त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत आहेत. त्यामुळे तो मानसिक रूपाने त्रासलेला आहे. ही समस्या लवकर सोडवा नाही तर तुमच्यासमोर आत्महत्या करणार आहे.
पोलिसांनी पीडित व्यक्तीची तक्रार गंभीरतेने घेतली आणि सर्विलांसची एक टीम तपासासाठी नेमली. यादरम्यान पीडित व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली की, दोन महिला आणि तीन पोलिसवाले कानपूर रोडवर उभ्या असलेल्या गाडीत त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी आले आहेत. पोलिसांची एक टीम लगेच घटनास्थळी पोहोचली.
घटनास्थळी तीन आरोपी पोलिसांच्या वर्दीत होते आणि त्यांच्यासोबत दोन महिला होत्या. पोलिसांनी पाचही लोकांना ताब्यात घेतले आहे.
चौकशी दरम्यान त्यांनी त्यांची नावे पंकज गुप्ता, अतुल सक्सेना आणि अजीजुल हसन सिद्दीकी अशी सांगितली. दोन महिला शिकार फसवण्याचं काम करत होत्या.
पोलीस कमीश्नर डीके ठाकूर यांच्यानुसार, ही गॅंग प्रोफेशनल पद्धतीने या महिला सोशल मीडिया साइटवर आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत फोनवरून गोड गोड बोलत होत्या.
त्यानंतर हनी ट्रॅप मध्ये अडकवून पुरूषांना ठरलेल्या ठिकाणी बोलवत होते. जसाही एखादी व्यक्ती ठरलेल्या ठिकाणी पोहचत होती तेव्हा दोन महिला त्या व्यक्तीसोबत अश्लील गोष्टी बोलत होत्या.
त्यानंतर त्यांचे कपडे काढत होत्या. तेव्हाच तिथे ठरल्याप्रमाणे ३ लोक पोलिसांच्या कपड्यात येत होते. ते कपडे काढलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ-फोटो काढत होते.
त्या व्हिडीओवरून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. या गॅंगकडून काढलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून पैसे वसूल केले जात होते. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होते.
दोन महिलांना अटक केली आहे. त्या सोशल मीडियावरून हनी ट्रॅपच्या माध्यमातून लोकांना फसवत होत्या. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून पैसे मागत होत्या. त्या आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केली जात आहे.