जळकोट तालुक्यातील मौजे घोणसी येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची महाराष्ट्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पाहणी केली.
जल जीवन मिशनच्या संचालिका श्रीमती आर.विमला यांच्यासह उदगीर तालुक्यातील मौजे सुकणी, किनी येल्लादेवी येथील कामांची पाहणी केली.
पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या जलजीवन अभियानाविषयी जनजागृती होण्यासाठी उदगीर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले कि, जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरदोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याअंतर्गत गावागावांमधील प्रत्येक कुटुंबाला अधिकाधिक प्रति लिटर पाणी कसे मिळेल यावर भर देत आहोत.
या अभियानाची ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर यांच्यामार्फत प्रबोधन करण्यात येईल, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आवश्यक गरजा म्हणून गणल्या जातात.
यापुढे शुध्द पाणी आणि स्वच्छता या दोन घटकांची जोड देणे आवश्यक आहे. कारण हीच पंचसूत्री आपल्याला येणाऱ्या काळात तारणहार ठरणार आहे.
कारण पाणी आहे तर जीवन आहे असे आपण म्हणतो. त्यामळे पिण्याचे पाणी स्वच्छ आणि चांगले उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. या मिशन अंतर्गत ते ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे सांगून नागरिकांनी पाण्याबद्दल अधिक जागरूक राहावे असे आवाहन केले.
यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ज्ञानेश्वर पाटील, तहसीलदार संदीप कुलकर्णी, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, गट विकास अधिकारी उदगीर महेश सुळे, गटविकास अधिकारी जळकोट चंद्रहार ढोकणे, उदगीर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, जळकोट काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पांडे, जळकोट राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, सभापती बालाजी ताकबीडे, प्रा. शाम डावळे, मेहताब बेग यांच्या सह दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
तसेच मौजे सुकणी येथील सरपंच श्रीमती आशाताई कणकुरे, मिराताई सुकणे, सुनिल सुकणे, दत्ता बामणे, माधव कांबळे, विठ्ठल मूळे, विठ्ठलराव मुळे, विठ्ठल सुकणे, चांदोबा सुकणे, दिलीप जाधव, शिवाजी सुकणे, शेख मिठुमियां, ज्ञानोबा कणकुरे, बालाजी मुळे, रामेश्वर सुकणे, जितेंद्र सुकणे, दिलीप कोकणे, केशवराव मुळे उपस्थित होते.
मौजै घोणसी ता. जळकोट येथील सरपंच दत्ता घोणसीकर, दिपक आंबरे, दत्ता बिरादार, सोमेश्वर परगे,सुजित मालुसरे, ताहेर देशमुख, राहुल मालुसरे, नारायण मालुसरे, अंबादास बिरादार, ईश्वर डावळे, प्रा. ईश्वर पाटील, विदयाभुषण आंबरे, व्यंकटराव जानतिने, विश्वजीत पाटील, शरद कोकणे, विजय तेलंग, लक्ष्मण मालुसरे, लक्ष्मण जानतिने, बालाजी डावळे इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे. किनी यलादेवी येथे सरपंच श्रीमती शकुंतला जीवनराव बिरादार, बालाजी बिरादार, रोहीदास कुंडगिर, ज्ञानेश्वर नारागुडे, अर्जुन पाटील, ज्योतिर्मय मलशेटे, जनार्दन पाटील, शाबिरमियां देशमुख, गुणवंत बिरादार, नागनाथ मलशेटे, भाऊसाहेब पाटील, संतोष बिरादार, अर्जुन बिरादार, सय्यद सुलेमान, गौसोदीन शेख, विष्णू कांबळे, जगदीश बिरादार, कमलताई जाधव, चांदसाब शेख, विठ्ठल डावकरे, अंकुश मुळे, विजयकुमार बिरादार, राघव बिरादार, श्रीमती संगीताताई बिरादार, प्रभावतीताई कांबळे यांच्या सह अनेक महीला भगिनी, नागरीक उपस्थित होते.