चाकूर तालुक्यातील मौजे हटकरवाडी येथे अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली. यासंदर्भात चाकूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याची 17 वर्षांची मुलगी घरी होती. फिर्यादी व त्यांची पत्नी नळेगाव येथे लग्नाचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते.
त्यानंतर अज्ञात इसमाने त्यांच्या मुलीला घरातून पळवून नेले. त्यानंतर त्यांनी गावभर शोध घेतला आणि नातेवाईकांकडूनही चौकशी केली पण अद्याप मुलगी सापडली नाही. तिच्या कुटुंबियांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.