कात्रजमधून बेपत्ता झालेली मुलगी पुणे रेल्वे स्थानकात सापडली; आरोपीच्या तपासात धक्कादायक बाब उघड

180
Missing girl from Katraj

पुणे : कात्रज येथून शनिवारी बेपत्ता झालेली एक अल्पवयीन मुलगी रविवारी पुणे रेल्वे स्थानकात सापडली. मुलीला भीक मागण्याच्या उद्देशानेच अपहरण करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सर्जेराव उमाजी बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

शनिवारी कात्रज येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मुलीच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी बेपत्ता असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर मेसेज पाठवून तिचा शोध सुरू केला.

दरम्यान, रविवारी सकाळी रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी संशयास्पद हालचालीवरून मुलीबरोबर एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता अपहरण केल्याचा प्रकार समोर आला.

सुरक्षा दलाने पोलिसांना माहिती दिली आणि आरोपी व मुलीला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. सर्जेराव उमाजी बनसोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या चौकशीत धक्कादायक तथ्य समोर आले आहे.

मुलीला भीक मागण्यास भाग पाडणे हा त्यामागील हेतू होता. यासाठीच तिचे अपहरण झाले असल्याची माहिती आहे आणि पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here