उदगीरात महिलेचा विनयभंग | ग्रामीण पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

354
Crime News

उदगीर : आयटीआय कॉलेज जवळील पीके बार शेजारी 17 मे रोजी आरोपींनी काही लोकांना सोबत घेऊन पीडित महिलेच्या घरी गेले.

फिर्यादीसोबत मागील भांडणाच्या रागातून पीडितेला भांडण मिटविण्यासाठी चर्चा करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी घेऊन गेले.

त्यानंतर हातात काठ्या, सळई, बिब्याचे तेल व मिरची पावडर घेऊन फिर्यादीस मारहाण करून गंभीर जखमी करून फिर्यादीची छेड काढली व पीडितेच्या अंगास स्पर्श करून विनयभंग केला.

फिर्यादीच्या चेहऱ्यावर, बेंबी पासून गुप्त भागापर्यंत बिब्याचे तेल लावून गंभीर इजा पोहचवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी फिर्याद पीडित महिलेने ग्रामीण पोलिसांकडे दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून 11 संशयित आरोपीविरुद्ध 27 मे गुरुवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.रं.न. 198/2021 कलम 354 354 (ब) 326 (अ) 324, 323, 509, 143, 147, 148,149, 504 व 506 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक गायके यांच्याकडे देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here