मम्मी पप्पांना चटके बसत आहेत : राजीव सातवांच्या चिमुकलीच्या एका वाक्याने उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फोडला !

859

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्यावर सोमवार (दि.१७) ला अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी त्यांच्या दहा वर्षीय मुलीने चितेला अग्नी देताच ‘मम्मी पप्पाला चटके बसत आहेत’ असे निरागसपणे म्हणताच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.

राज्यसभेचे खासदार तथा गुजरात प्रभारी राजीव सातव यांचे उपचारा दरम्यान पुण्यात निधन झाल्यानंतर सोमवार (दि. १७) ला त्यांच्यावर कळमनुरी येथील त्यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

तत्पूर्वी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. कळमनुरी व हिंगोली लोकसभा मतदार संघाप्रमाणेच राज्यातील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती होती. राज्याबाहेरुन ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

यावेळी राजीव सातव यांनी आपल्या कार्यकाळात विविध क्षेत्रातील जोडलेल्या माणसांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून रांगेत शिस्तीने आपल्या आवडीच्या नेत्याचे शेवटचे अंत्यदर्शन घेत अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली.

स्व.सातव यांच्या पार्थिवाजवळ त्यांच्या आई माजी मंत्री रजनी सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा पुष्कराज व मुलगी, मामा प्रताप वाघ, प्राचार्य डॉ. बबन पवार यांच्यासह निकटवर्तीय नातेवाईकांची उपस्थिती होती.

यावेळी दहा वर्षीय मुलीने पूर्ण वेळ पार्थिवाजवळ बसून शोक मग्न बसलेल्या आईला अतिशय समंजसपणे धीर देत होती. आपल्या पप्पाचा शवपेटीतील चेहरा एकटक बघत असल्याचे चित्र पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होती.

त्यानंतर अंत्यसंस्कार वेळी मुलगा पुष्कराज सातव यांने चितेला अग्नी देताच सातव यांच्या मुलीने मम्मी पप्पाला चटके बसताहेत असे म्हणून अश्रूंना वाट मोकळी करुन देत आक्रोश करणाऱ्या उपस्थितांच्या डोळ्यात मुलीच्या या एका वाक्याने अश्रूंचा महापूर आणला, साऱ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

राजीव सातव यांच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्याकरिता कळमनुरी, हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील नागरिकांनी उपस्थिती लावली. श्री सातव यांचे पक्षसंघटनेत असलेले संबंध व वजन पाहता राज्यभरामधील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री तसेच विविध राज्यातील पक्षाचे पदाधिकारी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती

यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रभारी के. एच. पाटील, महुसल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री असलम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, पूनर्वसन व मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सतेज पाटील, काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अमर राजूरकर, गुजरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते परेश धनानी, खासदार हेमंत पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे, आमदार माधवराव जवळगावकर,आमदार राजू नवघरे, आमदार आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, भाऊ पाटील, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. श्रीनिवास, सत्यजित तांबे, अमर खानापुरे, गुजरात युवक काँग्रेसचे मानसिंग डोड्या, श्री संपत कुमार, नीरज कुंडल, यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here