जनाब देवेंद्र फडणवीस यांच्यासह बहुतेक भाजपाई हिरवे | सोशल मीडियावर एका पोस्टचा ‘धुमाकूळ’

188

शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’ वरून भाजपानं शिवसेनेवर टीका केली असताना आता सोशल मीडियावर दावत-रोझा-इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे.

यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत.त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे.

ट्विटर, फेसबुकवर या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला असून बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब म्हणून केल्याने शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दावत-रोझा-इफ्तारचं आयोजन अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये इफ्तारची तारीख (७ जून २०१८) देण्यात आली आहे.

मुंबईतील सीएसटी येथील पलटन रोड परिसरातील हज हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरवर असून त्यापुढे जनाब लिहिण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर पाहुणे म्हणून भाजप नेते शाहनवाझ हुसेन, तत्कालीन मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांचा उल्लेख आहे.

पोस्टरवरील मजकुरासाठी हिरवा रंग वापरण्यात आला आहे. भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश असलेले इफ्तारचं हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

काय आहे प्रकरण ?

शिवसेनेने गेम करून भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून नेल्यापासून शिवसेना भाजप नेत्यांच्या नेहमीच निशाण्यावर राहिलेली आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारले होते.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असं विधान केलं होतं.काही कालावधी उलटताच शिवसेनेच्या विभागप्रमुखाने अजान स्पर्धा आयोजित केली होती.

अर्थात त्यानंतर या स्पर्धेशी काहीही संबंध नसल्याचं दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी खुलासा केला होता.

आता पुन्हा एकदा भाजप- शिवसेना यांच्यात कॅलेंडरवाद पेटलेला असून शिवशाही कॅलेंडर 2021 वर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख चक्क ‘नाब बाळासाहेब ठाकरे ‘ असा केल्याने भाजपने शिवसेनेला निशाण्यावर घेतले होते.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या कॅलेंडरचा फोटो पोस्ट करीत शिवसेनेवर जहरी टीका केली होती. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर 2021 असं लिहिलं असून वरच्या दोन्ही कोपऱ्यात शिवसेना आणि युवासेना असाही उल्लेख करण्यात आला होता.

विशेष म्हणजे हे कॅलेंडर मराठी, इंग्रजीबरोबरच उर्दू भाषेतही आहे. या कॅलेंडरवर इस्लामिक महिना आणि इतर गोष्टी उर्दूमध्ये लिहिण्यात आल्या आहेत.

अतुल भातखळकर यांनी या कॅलेंडरचा फोटो पोस्ट करीत, ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा खोचक टोला लगावला होता मात्र आता जुने पोस्टवर व्हायरल झाल्यावर भाजप नेते काय उत्तर देतील हे येत्या काळात पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here