अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या जावयाचा ‘चक्क’ सासुवर बलात्कार !

288

अहमदनगर : एका महिलेस तुझ्या मुलीबरोखर माझ्या मुलाचा विवाह लावुन देतो, असे म्हणून लग्नाचे अमिष दाखविले.

आपल्या मुलीचे लग्न व्हावे या आमिषाने महिलेकडून पैशाची मागणी केली.

तेव्हा महिलेने १ लाख ६० हजाराचे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज दिला.

महिलेचा विश्‍वासघात करुन होणारा ‘जावई’ पांडुरंग अंकुश खोरे याने घरात घुसून ४५ वर्ष वयाच्या विवाहित महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

या खळबळजनक प्रकरणी भिटेवाही परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या विवाहित महिलेने काल बेलवंडी पोलिसात फसवणूक व बलात्कार केल्याची तक्रार दिली.

फिर्यादीवरून आरोपी पांडुंरग अंकुश खोरे, अंकुश खोरे, दोघे रा. काष्टी, ता. श्रीगोंदा व त्याच्या ओळखीचा एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अंकुश खोरे हा पीडित महिलेस ‘पांडुरंग अंकुश खोरे’ याच्याचरोबर तुमच्या मुलीचे लग्न लावून देतो, असे अमिष दाखविले.

पीडित महिलेचा विश्वास संपादन करून दागिने व रोकड असे मिळून ७ लाख १५ हजार रुपये घेतले.

पांडुरंग खोरे व अंकुश खोरे यांनी सदर महिलेस पैसे व दागिने मागितले असता ते परत दिलेच नाही.

रोख रक्कम व दागिनेपण घेवुन गेले. महिलेने रोख व दागिने मागितल्यावर आरोपी नं. ३ हा घराच्या बाहेर उभा राहिला.

त्यानंतर आरोपी पांडुरंग अंकुश खोरे हा महिलेच्या घरात घुसला व महिलेकडून शरीरसुखाची मागणी केली.

महिला ऐकत नाही तेव्हा तिला बळजबरीने झोपण्याच्या खोलीत नेवून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी बलात्कार केला.

बलात्कार करून ‘तू कोणाला काही सांगितले तर तूझ्या कुटुंबाला जिवे ठार मारून टाकील, अशी धमकी दिली.

दि.४.६.२०१८ त्यानंतर एक महिन्याचे काळात व १७.१.२०२१९ च्या रात्री ८ च्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला.

याप्रकरणी पिडीत महिलेने काल बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी पांडुरंग अंकुश खोरे, अंकुश खोरे व एक अनोळखी अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here