दररोज अनेक विचित्र घटना वाचायला आणि ऐकायला मिळतात. विवाहित महिला आपल्या प्रियकराला घेऊन पळाल्याच्या घटनाही नवीन नाहीत.
मात्र काही घटना एवढ्या विचित्र असतात की हसावं की रडावं हेच कळत नाही. आता अशीच एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील ही खळबळजनक घटना आहे. इथे तीन लेकरांची आई असलेली महिला १४ वर्षांच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.
ज्यानंतर महिलेच्या पतीने पोलिसात यावरून तक्रार दिली आहे. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.
गोरखपूरच्या कॅम्पियरगंज गावातील एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली आहे. यात त्याने म्हटले आहे की, त्याची पत्नी गावातील एका अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे.
पीडित व्यक्तीने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून पत्नीचं गावातील एका १४ वर्षीय मुलासोब अफेअर सुरू होते.
त्यामुळे ती पत्नीपासून दूर राहू लागली होती. पत्नीच्य वागण्यावरून पतीला संशय आला.
यावरून दोघांमध्ये वाद होत होता. महिलेच्या पतीने सांगितले की, महाशिवरात्रीच्या दिवशी गावात जत्रा भरली होती. या जत्रेत ती तिच्या प्रियकरासोबत गेली होती. पण ती रात्री उशीरापर्यंत घरी परतलीच नाही.
त्यानंतर आजूबाजूला तिचा शोधही घेतला. पण तिचा पत्ता काही लागला नाही. मिळालेल्या माहितीनुसार महिला तीन लेकरांची आई आहे.
महिलेसोबत फरार झालेला मुलगा हा सातव्या वर्गात शिकतो. त्याचे महिलेसोबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते.
मुलाच्या कुटुंबियांनी देखील तेच सांगितले की, महिलेनेच त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेले आहे. मुलाच्या कुटुंबियांनीही पोलिसात तक्रार दिली आहे. आता पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.