आळंदी येथे दोन मुलांच्या आईचे लग्न लाऊन दिले पण मोबाइलमुळे ‘बिंग’ फुटले !

239
Drugs worth Rs 2 crore seized in Mumbai Son of biggest drug supplier arrested

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अविवाहित तरुणांकडून पैसे घेऊन बनावट विवाहांची व्यवस्था करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 

या प्रकरणात आठ महिलांना अटक करण्यात आली आहे. या पद्धतीने अनेक तरुणांवर फसवणूक केल्याचा आरोप या महिलांवर करण्यात आला आहे आणि पुढील तपासात त्यांची कर्मे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मावळ तालुक्यातील दिवड गावच्या एका तरुणाचा विवाह जमत नसल्याची माहिती आरोपी ज्योतीला मिळाली. त्यानुसार ती त्याच्या घरी गेली.

ज्योती रवींद्र पाटील (वय 35, रा. केसनंद फाटा, वाघोली), महानंद तानाजी कासळे (वय ३९, रा. काळेपाडळ, हडपसर), रुपाली सुभाष बनपट्टे (वय 37), कलावती सुभाष बनपट्टे (वय २५), सारिका संजय गिरी (वय ३३), तिघी, स्वाती धर्म साबळे (वय २ 4, रा. भेक्रीनगर, हडपसर), मोना नितीन साळुंके (वय २८, रा. महाराष्ट्र बँक, मांजरी), पायल गणेश साबळे (वय 24 रा. गडाड, ता. खेड) आणि विद्या सतीश खंडाळे अशी नावे आहेत. त्याला चार दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.

तिच्या ओळखीतील एक मुलगी विवाहासाठी तयार असल्याचे सांगितले. दोन मुलांची आई असलेल्या विद्या खंडाळे हिला तिने विवाहासाठी तयार केले आणि सोनाली जाधव या नावाने तिची तरुणासोबत ओळख करून दिली. या विवाहासाठी पाटील हिने तरुणाकडून दोन लाख ४० हजार रुपये घेतले.

काही दिवसांनंतर ज्योतीने आळंदी येथे त्याचे लग्न केले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे विद्या खंडाळे सोमवारी माहेरी जात होती. 

ज्योती तिला घेऊन जायला येणार होती. मात्र, विद्याच्या वागण्यामुळे या युवकाच्या कुटुंबाला विद्याचा संशय आला. त्यावेळी या युवकाच्या कुटुंबीयांना तिच्याबद्दल अधिक माहिती मिळाली. तेव्हा समजले की तिला दोन मुले आहेत. 

तिच्या मोबाईलमध्ये पैसे आणि दागिने घेऊन पळ काढण्याचा प्लानहि त्यांना दिसून आला, हि माहिती पाहून सासरची लोक हादरून गेली, त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाची माहिती दिली.

पोलिसांनी देखील तातडीने कारवाई करत या प्रकरणात सामील असलेल्या महिलांना अटक केली आणि वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या फसवणुकीच्या टोळीची प्रमुख ज्योती पाटील होती. ज्योती विवाह जमत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी संपर्क साधत असे, त्यानंतर त्यांच्याकडून दोन ते तीन लाख रुपये घेऊन टोळीतील एका महिलेला त्याच्याशी विवाह करण्यासाठी तयार करायची. 

विवाह झाल्यानंतर संबंधित तरुणी सहा ते सात दिवस सासरी राहत असे. त्यानंतर अगोदर ठरल्याप्रमाणे ती तरुणी सासरच्या घरातील सर्व दागदागिने चोरून माहेरी जायची आणि मग मग सासरी जाण्यास नकार द्यायची. 

तिने या प्रकारे अनेकांची फसवणूक ल्याचे समोर आले आहे. मात्र, समाजातील प्रतिष्ठेपोटी हे नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here