सोलापुर : येथे आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्र बनवून वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणात लाखो रुपयांसह १६८ तोळे सोनं लंपास केल्याच्या तक्रार वृद्ध महिलेने केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने स्वत:चा मुलगा, नातू आणि सुनांवरच हा आरोप लावला आहे.
सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यानुसार वृद्ध महिलेचे पती महादेव बागदुरे यांचा काही महिन्यापुर्वी मृत्यू झाला.
महादेव बागदुरे यांनी मृत्यूपुर्वी पत्नी म्हणजे भंगरेवा बागदुरे यांच्या नावे ७० लाख रुपयांची ठेव ठेवली होती.
तसेच पती आणि पत्नीच्या जाँईट खात्यावर २० लाख रुपये ठेवले होते.
वृद्ध महिला भंगरेवा यांच्या मुलगा, नातू आणि दोन सुनांनी बनावट कागदपत्रे तयार केली.
त्यांच्या समंतीविना बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर ठेवी स्वत:च्या नावावर करुन घेतल्याचा आरोप वृद्ध महिलेने केला आहे.
तसेच १५० तोळ्यांपेक्षा जास्त सोने, ५० तोळे चांदी, मौल्यवान वस्तू, खतावणी आणि कागदपत्रे काढून घेतले असल्याचा आरोप भंगरेवा यांनी केला आहे.
या महिलेच्या पतीने ठेवी एका सहकारी पतसंस्थेत ठेवल्या होत्या.
दरम्यान, पतसंस्थेने ते पैसे समंतीशिवाय इतरांना कसे दिले याचा तपास पोलीस करत आहेत.
याप्रकरणात सहापैकी पाच जणांनी अटक करण्यात आली आहे.