सध्या अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटामागे काहीना काही वादांची मालिका सुरु आहे.
प्रख्यात लेखक हुसेन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकात गंगूबाईंचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
संजय लीला भन्साळी यांनी लॉकडाउनपूर्वी ‘गंगूबाई कठियावाडी’ या चित्रपटाची घोषणा केली होती. यात कामाठीपुरामधल्या देहविक्री करणार्या महिलांच्या ‘गंगूबाई’ यांचा संबंध मोठ्या गुन्हेगारांशी असल्याचे दाखवले जात आहे आणि नुकताच या चित्रपटांचा पोस्टर रिलीज झाला आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटाचा टीझर पोस्टर रिलीज केल्यानंतर अवघ्या काही तासातच रिलीज करण्यात आला आहे.
याच ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकावर हा चित्रपट तयार केला जात आहे. माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या धर्तीवर संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई काठियावाडी यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवायचा होता. त्यानुसार त्यांनी या चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
प्रेक्षकांची उत्सुकता या चित्रपटाच्या टीझरमुळे शिगेला पोहचली आहे. हा चित्रपट येत्या 30 जुलैला रिलीज होणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटातून मुंबईतील माफियांच्या टोळीत असलेल्या गंगूबाईचा बेधडक स्वभाव आणि तिच्या आयुष्यातील टप्पे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसच्या आधारावर ‘सरकार’ आहे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका
हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकानुसार गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होती.
यामुळेच तिला गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखले जाऊ लागले. कमी वयातच गंगूबाईला वेश्या व्यवसायाच्या काळ्याकुट्ट दलदलीत ढकलण्यात आले.
यादरम्यान कुख्यात गुंड गंगूबाईचे ग्राहक झाले. गंगूबाईचा मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय चालत होता. याच दरम्यान तिने शरीर विक्री करणाऱ्या महिलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी कामे करायला सुरुवात केली.
गंगूबाईचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. तिला अभिनेत्री व्हायचे होते. पण वयाच्या १६ व्या वर्षी तिला वडिलांच्या अकाउंटन्टशी प्रेम झाले आणि लग्न करून ती मुंबईत पळून आली.
मोठ मोठी स्वप्न पाहणाऱ्या गंगूबाईने आपल्या पुढे काय वाढून ठेवले ठेवले आहे याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त ५०० रुपयांसाठी कोठ्यावर विकले. हुसैन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकात कुख्यात गुंड करीम लालाचाही उल्लेख केला आहे.
पुस्तकानुसार, करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाई करीमला भेटली आणि त्याला राखी बांधून भाऊ केले. आता करीम लालाची बहीण झाली म्हटल्यावर आपोआपच तिचे कामाठीपुरामध्ये वजन व दबदबा वाढला.
शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं होते की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईचा डॉन करीम लालाला भेटत असे. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत होते. करिम लाला, मस्तान मिर्झा उर्फ हाजी मस्तान मुंबईचे पॉवरफुल डॉन होता.
करीम लाला असा होता ज्याला मुंबईचा पहिला माफीया डॉन म्हणून ओळखले जाते. करीम लाल 1960 पासून 80 च्या दशकात सक्रिय होता. करीम लालाच्या गँगचं नाव पठाण गँग होते. तेव्हा मुंबईत असे म्हटले जाते की, करीम लालाचे फीमेल डॉन गंगुबाईसोबत जिव्हाळ्याचे नाते होते.
गंगूबाई बद्दल असे म्हटले जाते कि, कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही. आलिया भट्टच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची करण जोहरच्या कलंक सिनेमात दिसली होती.
कलंक सिनेमाआधी तिचा ‘गली बॉय’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची जोडी प्रेक्षकांना आवडली होती.
संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठीयावाड हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या माफीया क्विन ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारीत आहे. या सिनेमात गंगुबाईचा रोल आलिया भट्ट साकारत आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.