मुंडे भाऊ बहिणीचे नाते | प्रीतम मुंडे यांच्या काळजीत धनंजय मुंडेचे ट्विट

660

राज्यातील जनतेला बीडमध्ये धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधील वाद काही नवा नाही. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले आहेत.

मात्र त्यापलिकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेले नाते देखील बऱ्याचदा समोर आले आहे.

भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी शनिवारी संध्याकाळी प्रकृती अस्वस्थ जाणवल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता.

त्यावर प्रीतम मुंडे यांच्यासाठी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी ट्वीट केले आहे.

प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे. काही लक्षणे आढळल्यामुळे बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे या उपचार घेत असल्याचे समजले.

ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने आपण लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो, असं आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भावाच्या सदिच्छांना प्रतिसाद देत “धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here