त्या महिलेच्या हत्येचे गूढ काही तासांत उघडकीस आले | धक्कादायक प्रकार असा उघडकीस आला

216

डोंबिवलीतील रेशन दुकानदाराच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. काम करणाऱ्या कामगाराने दुकानदाराच्या बायकोकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी कामगारांनी केली. त्याची मागणी धुडकावल्याने हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या महिलेने त्याच्या निर्लज्ज मागणीला फेटाळून लावण्यासोबतचं पतीकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त कामगारांने दुकानदाराच्या पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

डोंबिवलीतील लोढा हेवन भागातील घटनेने रविवारी एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी गुड्डू कुमार उर्फ रंजन याला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दुकान मालक राजेश गुप्ता आणि त्याची पत्नी श्वेता गुप्ता यांनी जेवणाआधी ड्रिंक्स घेतली. आरोपी गुड्डू कुमार डोंबिवलीतील किराणा दुकानात काम करत होता.

त्यामुळे रविवारी संध्याकाळी दुकानाच्या मालकाने त्याला जेवणासाठी घरी बोलावले. तिघेजण गप्पा मारत बसले असताना दुकानदाराला महत्त्वाचा कॉल आला आणि कामानिमित्त त्याला घराबाहेर जावे लागले. त्यावेळी घराच्या मागच्या बाजूला दुकानदाराची पत्नी आणि कामगार गुड्डू एकटेच होते.

प्रथम मालकाच्या अनुपस्थितीचा आणि नंतर मालकाच्या निघण्याचा फायदा घेत गुड्डूने दुकानदाराच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

तिने त्याची गैर मागणी नाकारताच गुड्डूने तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गुड्डूचे असभ्य वर्तन पाहून त्या महिलेचा पारा चढला. तिने आपल्या नवऱ्याकडे या प्रकरणाची तक्रार देण्याची धमकी दिली.

दुकानदाराच्या पत्नीची धाडस पाहून आपली मालकाकडे तक्रार नक्की करेल या भीतीने आरोपी गुड्डू घाबरून गेला. त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला व वार करून तिला ठार केले. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

दुकान मालक घरी परतला तेव्हा त्याची पत्नी रक्ताने माखली होती. त्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दुकान मालकाने मनपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुकानदाराचा जबाब नोंदविला. त्याने कामगारांवर संशय व्यक्त केला.

त्यानुसार पोलिसांनी झोपडपट्टीवर छापा टाकून गुड्डू कुमारला अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी दरम्यान गुड्डूने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस त्याला पकडण्यात यशस्वी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here