नरपिशाच्च डॉक्टरची ‘खुनी’ कबुली | ५० खून केल्यावर मोजणी करणे सोडून दिले !

225

आपल्या देशात डॉक्टरांनी अनेक गुन्हे केले आहेत. ते त्यांच्या व्यवसायाशी निगडीत केले आहेत.

जर एखादा डॉक्टर खुनानंतर खून करत असेल तर तो डॉक्टर नाही तर नरपिशाच्च म्हटला पाहिजे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा याच्या विरोधात तब्बल १०० पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद असून दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

त्याने दिल्ली आणि शेजारच्या राज्यांमधील ५० हून अधिक ट्रक आणि टॅक्सी चालकांची हत्या केल्याचे समोर आले आहे . पॅरोलमधून सुटल्यानंतर तो पळून गेला होता मात्र त्याला आता अटक करण्यात आली आहे.

बनावट गॅस एजन्सी तसेच किडनी विकण्याच्या धंद्यात देखील तो सामील होता. देवेंद्र शर्मा आणि त्याचे साथीदार एलपीजी सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक लुटायचे आणि ड्रायव्हरची हत्या करायचे.

यानंतर ते ट्रकमधून सिलिंडर उतरवून आपल्या बनावट गॅस एजन्सीत नेत होते. त्याकाळी डिजिटल वगैरे तंत्रज्ञान आलेले नसल्याने त्याचा हा धंदा सुरळीत चालला होता.

सध्या तो पॅरोलवर बाहेर आला होता आणि पळून गेला होता. पळून गेल्यावर त्याने तिथे एका विधवेशी लग्न केले आणि मालमत्तेचा व्यवसाय देखील सुरु केला होता मात्र पोलिसांना ह्या घटनेची माहिती कळाली आणि त्याला अटक करण्यात आली.

मात्र जास्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने तो सन १९९४ मध्ये तो किडनी ट्रान्सप्लांटच्या आंतरराज्यीय टोळीत सामील झाला.

गुरुग्राम किडनी रॅकेट प्रकरणी २००४ मध्ये इतर डॉक्टरांसोबत त्यालाही अटक करण्यात आली होती, असं डीसीपींनी सांगितलं.

बिहारमधील सिवान येथून बीएएमएसची डिग्री मिळवल्यानंतर जयपूरमध्ये त्याने स्वतःचे क्लिनिक उघडले. त्यानंतर १९९२ मध्ये त्याने गॅस डीलरशिप योजनेत ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली.

त्यात त्याचे मोठे नुकसान झाले मात्र हताश न होता त्याने १९९५ मध्ये त्याने अलीगढच्या छारा गावात बनावट गॅस एजन्सी सुरू केली आणि तिथून त्याची गुन्हेगारी सुरू झाली.

पेशाने डॉक्टर असलेला हा गुन्हेगार पॅरोलवर बाहेर होता मात्र पॅरोलचा कालावधी संपल्यावर तो गायब झाला होता. सहा महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे.

तब्बल ५० हत्या केल्यानंतर मोजणी करणे थांबवले अशी धक्कादायक कबुली त्याने दिली असून तब्बल ६२ वर्षे वयाचा हा डॉक्टर बीएएमएस पदवीधर असून देवेंद्र शर्मा असे या नराधमाचे नाव आहे.

अर्थात याआधी देखील तो तुरुंगात गेलेला आहे. अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांमध्ये शर्माला दोषी ठरवण्यात आलं आहे.

बनावट गॅस एजन्सी चालवल्याबद्दल त्याला उत्तर प्रदेशात दोनदा अटक करण्यात आली होती. किडनी विकणारी टोळी चालवल्याप्रकरणी अनेक राज्यातील तुरुंगात त्याची रवानगी झाली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here