सांगली : राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावर भाजपा आमदार आणि गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बोलताना बोचरी टीका केली आहे.
लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर जयंत पाटील राजकारणात आले आहेत.
जयंत पाटील हे पात्रता नसलेले राजकारणी असून, फक्त बापाच्या पुण्याईवर राजकारण करीत आहेत, अशी घणाघाती टिका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.
जयंत पाटील राष्ट्रवादीतुन मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही. त्यामुळे जयंत पाटलांनी झेपलं तेवढच बोलाव, असा सल्लाही दिला आहे.
शरद पवार व अजित पवार यांच्यावर राजकारण करणारे नेते असून मुख्यमंत्रीपदाचे दिवास्वप्न पहात आहेत. खरे तर जयंत पाटलांनानासा किंवा यूनो मध्ये वगैरे पाठवता येते का हे पवार साहेबांनी पाहायला पाहिजे.
कारण ते फार बुद्धिमान आहेत, असा त्यांच्या पक्षाचा समज आहे, असा टोलाही पडळकरांनी लगावला आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.