मुंबई – परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर (Rajesh Vitekar) यांच्यावर तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी लैंगिक अत्याचार पीडितेसह विटेकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
पीडितेचा आरोप काय आहे?
माझे अश्लील व्हिडिओ तयार केले गेले आहेत. मागील वर्षभरापासून आपल्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. मी तक्रार दाखल केलेली असून अद्याप गुन्हा दाखल केला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, परंतु फक्त चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते.
शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, असे राजेश विटेकर यांचे म्हणणे आहे. तृप्ती देसाई यांनी आरोप केला आहे की, राजेश विटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करा, कारण त्यांची आईसुद्धा या प्रकरणात सहभागी आहे.
“आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार… तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह पत्रकार परिषद” अशी फेसबुक पोस्ट लिहून तृप्ती देसाई यांनी राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती.
राजेश विटेकर कोण आहेत?
39 वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष
सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक
शिवसेना उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव
4 लाख 96 हजार 742 मतं मिळवत विटेकर दुसऱ्या क्रमांकावर
5.3 कोटी रुपयांची संपत्ती, तर 8.7 लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख
राजेश विटेकर पदवीधर असून शेती व्यवसाय असल्याचाही उल्लेख
यापूर्वी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर लैंगिक छळाचा आरोप होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या आयुष्यातील बाईबद्दल जाहीर निवेदन केले. आपल्यावर आरोप करणार्या महिलेने नंतर ती तक्रार मागे घेतली.
महाविकास आघाडी सरकारविरोधात आरोप
दुसरीकडे, शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप होत होते. तरूणीच्या आत्महत्येनंतर राठोड संशयाच्या भोवऱ्यात अडकले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या दोन मंत्र्यांवरील आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते.