औरंगाबाद येथे तरुणीवर झालेल्या अत्याचारामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे मेहबुब इब्राहीम शेख (रा.शिरूर, बीड) नाव आल्यानंतर पोलीसांवर दबाव टाकण्याच काम गृहमंत्री अनिल देशमुख करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारचा आणि गृहमंत्र्यांचा निषेध नोंदवत शहरातील क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकाकडून गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
तसेच “राज्य सरकारच करायच काय, खाली मुंडक वर पाय, गृहमंत्री राजीनामा दो” अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
काय आहे हे प्रकरण?
औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात एका तरूणीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दिली. एका व्यक्ती ने नौकरीचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची ती तक्रार होती.
प्रकरण गंभीर असल्यामुळे पोलीसांनी ही तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला होता. आरोपी मेहबुब इब्राहीम शेख (रा.शिरूर, बीड) याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि गोंधळ सुरू होतो.
कारण या नावाची व्यक्ती राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी युवा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षाचे असते. मेहबुब इब्राहीम शेख (रा.शिरूर, बीड) मात्र गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिस कारवाई का करत नाहीत.
पोलीसांवर दबाव टाकण्याचं काम गृहमंत्री अनिल देशमुख करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य सरकारचा आणि गृहमंत्र्यांचा निषेध नोंदवत शहरातील क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली.
गृहमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच “राज्य सरकारच करायच काय, खाली मुंडक वर पाय, गृहमंत्री राजीनामा दो” अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या.
या आंदोलनात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, संजय केनेकर, विक्रांत पाटील, राज वानखेडे, विजय औताडे, सुधीर तुपे, भीमा धर्मे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.