कोरोनाचा नवीन स्ट्रेन आरटीपीसीआरच्या टेस्टलादेखील हुलकावणी देत आहे. कारण अनेकदा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असतो, परंतु टेस्ट रिपोर्टमध्ये निगेटिव्ह येत आहेत.
त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर व्हायरसने शरीरावर किती नुकसान केले आहे, हे तपासण्यासाठी काही टेस्ट करणे गरजेचे आहे.
कोरोना झाल्यावर बिनधास्तपणाला मुरड घालून अधिक काळजी घ्यावी लागते. कोरोना पश्चात काही चाचण्या करून घेणे आवश्यक असते. त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या!
● अँटीबॉडी टेस्ट : तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोनामुळे शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान होते. विशेषत: कोरोना व्हायरस फुफ्फुसांवर आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर हल्ला करतो.
यासाठी अँटीबॉडी टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यात शरीरातील अँटीबॉडीजची स्थिती काय आहे, हे या टेस्टद्वारे समजते. कोरोनातून बरे झाल्यानंतर दोन आठवड्यांनी ही टेस्ट करणे गरजेचे आहे.
● सीबीसी टेस्ट : सीबीसी टेस्ट म्हणजे कंम्प्लीट ब्लड काऊंट टेस्ट. ही टेस्ट शरीरातील वेगवेगळ्या पेशींची तपासणी करण्यासाठी केली जाते.
यामुळे रुग्णाला कोरोना संसर्गाविरूद्ध त्याचे शरीर कसे प्रतिक्रिया देत आहे, याचा अंदाज येतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही चाचणी लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे.
● शुगर टेस्ट : शुगर आणि कोलेस्ट्रोल टेस्टदेखील अधिक महत्वाची आहे. शुगर असलेल्या रुग्णांसाठी ही चाचणी विशेष महत्त्वपूर्ण आहे.
कोरोनादरम्यान अनेकदा लोकांच्या शरीरात शुगरची पातळी वाढते. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी क्रिएटिनिन, लिव्हर आणि किडनी फंक्शन टेस्टदेखील करण्यास सांगितले जाते.