सध्या सोशल मीडियावर आजीचा एक व्हिडिओ सैराट होऊन धुमाकूळ घालत आहे. हा महाराष्ट्रातील एका विवाह सोहळ्याचा एक जुना व्हिडिओ आहे. यात सैराटमधील ‘झिंगाट’ गाण्यावर एक आजीबाई भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
या आजींच्या डान्स स्टाईलवर अनेकांनी टीका केली आहे. याउलट काही नेटिझन्सनी तुफान कौतुक केले आहे. एका युजरने सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की, आजीबाईंचा हा नृत्य उत्तम अभिनेत्रींना मागे टाकेल.
सदरील आजीचे वय अंदाजे 70 ते 75 वर्षांदरम्यान आहे. या वयातील जेष्ठ व्यक्तींना नीट चालतही नाहीत. पण ही आजी लग्नात भन्नाट डान्स करत आहे.
तरूणांप्रमाणेच आजी त्याच डान्स स्टेप्स करताना दिसतात. हा व्हिडिओ कोरोनाच्या या संकटात अनेकांच्या चेहेऱ्यावर दिलखुलास हसू आणत आहे. व्हिडिओला 90,000 पेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत.