देशात कोरोना रुग्णांची संख्या आता शहरांसोबत ग्रामीण भागातही झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावली जाहीर केली आहे.
नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला आहे. यासोबतच आशा कार्यकर्त्यांना यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि उप केंद्रात हे टेस्ट किट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
प्रत्येक गावागावात जाऊन आशा कार्यकर्त्यांना सर्दी तापाची नोंद करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत सॅनेटायझेशन आणि न्यूट्रिशन कमिटीही सक्रीय राहणार आहे.
ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील, त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या दरम्यान कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांनी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.