ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम आहे. यातही आपल्याला पहिले एक ऑनलाइन परीक्षा द्यावी लागते.
ती पास झालो तर ठीक नाही तर पुन्हा एकदा तीच परीक्षा १ महिन्याच्या आत द्यावी लागते.
त्यानंतर येते अजून एक कठीण परीक्षा ती म्हणजे गाडी चालवून द्यावी लागणारी परीक्षा. आता मात्र सरकारने हे सगळं परीक्षेचं ओझं कमी करण्यासाठी एक नवीन नियम आणला आहे.
आता तुम्हाला जास्त धावपळ करावी लागणार नाही तसेच ना कार्यालयाची चक्कर मारावी लागणार ना दलालांना शोधावे लागणार.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या तरतुदीनुसार, वाहन चालवण्यासाठी आता कोणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाहीये.
जर तुम्ही ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर मधून गाडी शिकत असाल तर परवान्यासाठी तुम्हाला आता टेस्ट देण्याची काहीही गरज राहिलेली नाही.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी आता अधिसूचनाही जरी केल्या आहेत. त्यासंदर्भात ,माहितीही दिलेली आहे. या अधिसूचनेनुसार ग्राहकांना सल्ला विचारला जाणार आहे.
ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स ला मान्यता
या योजने अंतर्गत मंत्रालय टेस्टसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देणार जेणेकरून ते त्याची अंमलबजावणी करतील.
यासाठी देखील मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पण खास सेवेसाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स ला सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करणे गरजेचे असणार आहे.
या योजनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देणार असल्याचे ही सांगण्यात आलं आहे