New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन

184

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद इमारतीचं भूमीपूजन केले. 

सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली. या समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्र प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री हरदीप सिंह पूरी आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह सहभागी झाले होते.

केंद्री कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्यांसहीत जवळपास 200 नेते लाईव्ह वेबकास्टमार्फत भूमीपूजन सोहळ्यासाठी हजर होते. ऑक्टोबर 2022 पर्यंत नवी संसद इमारत तयार करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे.

देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवसाचं आजोयन या संसद इमारतीमध्ये करण्यात येईल. ही इमारत पुढिल 100 वर्षांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात येणार आहे.

कशी आहे संसदेची नवी इमारत?

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था असणार आहे. सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत.

नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहे. या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल. याशिवाय 120 कार्यालये, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.

केवळ संसदेची नवी इमारतच नव्हे तर सर्व मंत्रालयं एकत्रित आणण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टही मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे राजधानीचं सगळं रंगरुपच बदलून जाणार आहे.

त्या बदलाची ही सुरुवात आता संसदेच्या कामामुळे दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र इतर देशाच्या संसद इमारती 300 ते 400 वर्षांपासून आहेत, हे देखील लक्षात घ्यायला हवं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here