जगातील प्रगत देशांमध्येही स्त्रीचे शरीर आणि तिची वेशभुषा यावरुन सतत चर्चा होत असते. अनेकींनी याविरोधात आवाज उठविला आहे.
अंगप्रदर्शन करुन ‘प्रस्थापित’ संस्कृतीरक्षकांना आरसा दाखविणाऱ्याची संख्या मोठी आहे. यात अनेक सेलिब्रेटींचा सहभाग आहे.
आता यासगळ्यावर सणसणीत उत्तर अभिनेत्री ‘वनिता खरात’ हिनं दिलं आहे. तिचं हॉट फोटोशुट कमालीचं व्हायरल झालं आहे, त्यानंतर पुनः चर्चा सुरु झाली आहे.
मला माझ्या टँलेटवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे विनाकारण मी कुणाला घाबरत नाही. माझ्यात आत्मविश्वास आहे. मी जशी आहे तशी आहे.
विशेष म्हणजे मला सगळ्यात जास्त माझ्या शरीराचा अभिमान आहे. वनितानं सोशल मीडियावर आपल्या अशाप्रकारच्या फोटोशुटसाठी खास हॅशटॅगही वापरला आहे.
आपण जसे आहोत तसे आहोत. जे शरीर आपल्याकडे आहे त्याविषयी आपल्याला अभिमान असायलाचं हवा.
त्याबाबत कुणाची भीती बाळगण्याची काहीच कारण नाही. जे कुणी इतरांच्या दबावाला बळी पडत असतील त्यांनी तसे करु नये, असेही म्हटलं आहे.
#BodyPositivity च्या माध्यमातून एक नवा विचार घेऊन ती चाहत्यांसमोर आली आहे. अर्थात तिच्या या फोटोशुटला अनेकांनी नावे ठेवली आहेत.
वनिताने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा बोल्ड फोटो पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पण अशाप्रकारचे फोटोशूट करण्यामागे एक खास कारण असल्याचे तिने तिच्या पोस्टद्वारे सांगितले आहे.
तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे.
त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे. तर काहींनी तिच्या अशाप्रकारच्या नव्या भूमिकेचे कौतूकही केले आहे. इंस्टावरील त्या हॉट फोटोशुटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोण आहे वनिता