राज्यात नाईट कर्फ्यू लागू होणार? विजय वडेट्टीवार यांचे स्पष्ट संकेत !

145
विजय वडेट्टीवार

नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टीं लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. 

मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. संध्याकाळी 6 ते सकाळचे 9 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्याठी राज्य सरकार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

राज्यभर नाईट कर्फ्यू लागू होणार का?

नाईट कर्फ्यूचे संकेत दिल्यानंतर राज्यात एकाच वेळी कर्फ्यू लागू केला जाणार का?, असा प्रश्न नागिरकांना पडत आहे. याविषयी बोलताना राज्यभर कर्फ्यू लागू करण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधीचे अधीकार दिले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या. कोरोनाचा प्रसार, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नाईट कर्फ्यू संदर्भात तेथील जिल्हाधिकारी निर्णय घेतील. तसे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाले आहेत. मात्र कितीही सांगितलं तरी लोक विनामास्कचे फिरत आहेत. कुठलीही काळजी लोक घेत नाही. त्यामुळे आता काही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, मास्क लावणं, गर्दी टाळणं, हे नियम नागरिकांनी पाळावेत. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचं सुरु केलं आहे.

साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरु आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते,” असे विजय वेडेट्टीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here