निखील जैनचा खासदार नुसरत जहाँबाबत खुलासा | ८ महिन्यापासून दोघांमध्ये दुरावा

409

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दल दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. निखिल जैनसोबत लग्न बेकायदेशीर असल्याचे नुसरत जहां यांनी म्हटले होते.

2019 मध्ये तुर्कीच्या कायद्यानुसार आमचे लग्न झाले, परंतु आता नुसरतने दावा केला की आमचा विवाह भारतीय कायद्यानुसार नोंदणीकृत नव्हता. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच येत नाही, हे जाहीर केल्यानंतर तिचे पती निखिल जैन यांनीही या विषयावर मौन सोडले आहे.

नुसरत जहांच्या वक्तव्यावर निखिल जैन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, लग्नाच्या एका वर्षा नंतर तिच्या वागण्यात कमालीचा बदल झाला. तिने लग्नापासून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. नुसरतचा गेल्या वर्षभरात स्वभाव खूप आश्चर्यकारक बदलला आहे.

2020 मध्ये शूटिंगनंतर नुसरतमध्ये हा बदल सुरू झाला. विशेषत: यश दासगुप्ताच्या ‘एसओएस कोलकाता’ चित्रपटाचे शूटिंग २०२० पासून सुरू होते. तेव्हा नूसरत आणि यशच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा रंगली होती. त्यावेळी मी अनेकदा नुसरतला लग्न भारतात नोंदवण्यास सांगितले पण नुसरतने प्रत्येक वेळी ते टाळले,  असा दावा निखिल जैन यांनी केला.

माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर नुसरत यांनी लावलेल्या आरोपांमुळे मलाही वाईट वाटते. यासाठी मला हा खुलासा करावा लागत आहे. मी प्रेमात पडलो आणि नुसरतला लग्नासाठी विचारले. त्या क्षणी तिने आनंदाने होकार दिला होता.

जून 2019 मध्ये तुर्कीमध्ये आमचे लग्न झाले. त्यानंतर कोलकाता येथे एक रिसेप्शन पार्टी आयोजित केली गेली. आम्ही पती-पत्नी म्हणून समाजासमोर आलो आहोत. एक प्रामाणिक पती म्हणून मी माझ्यापरीने सर्वकाही केले.

माझ्या मित्रांना व  कुटुंबीयांना माहित आहे की मी तिच्यासाठी काय केले. पण थोड्या दिवसांनी तिचा माझ्याप्रती दृष्टीकोन बदलू लागला. ऑगस्ट 2020 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिचा स्वभाव व वागणूक बदलत गेली.

कारण तिला तिच्या वागण्याचे कारण पूर्णपणे माहित आहे. “आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा मी तिच्याशी आमचे लग्न नोंदवण्याबद्दल बोलत होतो पण ती टाळत होती,” असे निखिल यांनी म्हटले आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये तिने आपल्या सर्व वस्तू, मौल्यवान दागिने आणि कागदपत्रांसह घर सोडले असल्याने आम्ही कधीही त्यानंतर एकत्र राहिलो नाही. माझ्याकडे असलेली काही कागदपत्रेही मी तिच्याकडे परत केली. माध्यमांमधील बातम्या पाहिल्यानंतर मला खूप पश्चाताप झाला.

आमच्या नात्यात अंतर आल्यानंतर 8 मार्च 2021 रोजी मी लग्नाला रद्द करण्यासाठी अलीपूर कोर्टात दावा दाखल केला. आमचे लग्न रद्दबातल करण्यासाठी न्यायालयात खटला प्रलंबित आहे. म्हणून मी वैयक्तिक खुलासे करू शकत नाही.

मात्र नुसरतच्या वक्तव्यानंतर मला काही तथ्य सांगण्यासाठी समोर यावे लागले. नुसरतने गृहकर्ज घेतले होते. मी तिच्या आर्थिक अडचणीत आमच्या कौटुंबिक खात्यातून तिला खूप मोठी रक्कम दिली आहे. तिचा आर्थिक ताण व त्रास कमी व्हावा, यासाठी काही पैसे तिच्या खात्यात जमा केले होते.

मी तिला ते पैसे प्रेमापोटी दिले पण तिने केलेला आरोप अपमानजनक आणि खोटा आहे. त्यात काही तथ्य नाही. माझ्याकडे बँक स्टेटमेंट आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट आहे. माझ्या कुटुंबीयांनी तिला मुलगी म्हणून स्वीकारले पण आजकाल तिच्या वागण्याने आमचे पूर्ण कुटुंब मानसिक दडपण आणि सामाजिक दृष्ट्या खचले आहे, असे निखिल जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here